मराठी भाषेला फार जूनी परंपरा आणि वारसा आहे. तशीच मराठी भाषेतील साहित्य परंपरा तेवढीच थोर आणि मोठी आहे. मराठी भाषेची फक्त लोकप्रियता नाही तर प्राचीन ते आधुनिक मराठी साहित्यातही भाषा वाढत गेली. त्याचीच परिणीती हा दिवस आहे.
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्म दिवसानिमित्त २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरवदिन साजरा केला जातो.